गोव्याच्या धर्तीवर चौपाटय़ा विकसित करा - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2012

गोव्याच्या धर्तीवर चौपाटय़ा विकसित करा - महापौर



मुंबई : गोव्यातील चौपाटय़ांच्या धर्तीवर मुंबईतील चौपटय़ांची स्वच्छता तसेच जीवरक्षकांची व्यवस्था करून चौपाटय़ा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर करावा, अशी सूचना महापौर सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला केली. 

मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनानंतर चौपाटय़ाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेचा आढावा घेताना महापौर पुढे म्हणाले की, चौपाटय़ांच्या दैनंदिन साफसफाई व्यतिरिक्त गणेश विसर्जनानंतर 15 दिवसांपर्यंत चौपाटय़ांच्या स्वच्छतेची विशेष मोहीम पालिकेच्या वतीने राबविण्यात येते. महापालिकेतर्फे सुरू असलेल्या या स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा करीत आहे. भरतीच्या वेळी वाहून येणारा तरंगता कचरा साफ करण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू असून यापुढील काळात हा कचरा तात्काळ साफ करण्याची सूचनाही महापौरांनी प्रशासनाला केली. मुंबईतील चौपाटय़ांना मुंबईबाहेरील नागरिक मोठय़ा प्रमाणात भेटी देत असतात. मुंबईत येणार्‍या या पर्यटकांना तसेच मुंबईतील नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, या हेतूने चौपाटय़ा स्वच्छ असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जुहू चौपाटीवर आऊटफॉल चेंबरच्या सांडपाण्यामुळे सकाळी चौपाटीवर फेरफटका मारणार्‍या नागरिकांना त्रास होत असून या चेंबरच्या पाइपची लांबी वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS