मुंबई : शिवडी येथे खड्डय़ात पडल्याने एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी शुक्रवारी स्थायी समितीत केली. मात्र या प्रकरणात या अधिकार्याच्या काहीही दोष नसल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी 'क्लीन चिट'देण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणी पोलिसांत या सहाय्यक आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांना या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करण्यास मिळावी, याकरिता या महिला अधिकार्यांची बदली करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनास दिले. पालिका अधिकारी-कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे शिवडी येथे पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून 14 वर्षीय मुलाला नाहक आपला जीव गमवावा लागला होता. या ठिकाणी काम करताना बॅरिगेट्स लावण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात सिद्ध झाले असल्याचे रईस शेख यांनी निदर्शनास आणले. त्यामुळेच स्थानिक पोलिसांनी येथील सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगत संबंधित महिला अधिकार्यासह निलंबित करा, अशी मागणी केली.
Post Top Ad
06 October 2012
Home
Unlabelled
सहाय्यक आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश / खड्डय़ात पडून मुलाचा मृत्यू
सहाय्यक आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश / खड्डय़ात पडून मुलाचा मृत्यू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment