वाढीव फी घेतल्याने सिद्धार्थ महाविद्यालयात आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2012

वाढीव फी घेतल्याने सिद्धार्थ महाविद्यालयात आंदोलन


सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यावर मोर्चाचा इशारा
मुंबई / अजेयकुमार जाधव 
पिपाल्स्च्या सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्त्यानी आज शनिवारी विद्यालयासमोर तीव्र आंदोलन करून वाढीव घातलेली फी परत करावी व वाढीव फी घेणाऱ्यावर कारवाही करावी अशी मागणी केली.  यावेळी पोलिसांनी जास्त फी घेतलेल्या प्राचार्यांवर कारवाही करायची सोडून आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थानाच आंदोलन केल्यास जेलमध्ये टाकून केसेस दाखल करू अश्या धमक्या दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव, भीमराज जगताप, अजित कांबळे, मंगेश अहिरे, स्वामी जावळे, इत्यादींनी अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेवून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा , जास्त घेतलेली फी परत करावी, जास्त फी घेणाऱ्या प्राचार्य व प्रशासनावर कारवाही करावी या मागणी केली.येत्या ४८ तासात अशी कारवाही न केल्यास सोमवारी आझाद मैदान पोलीस ठान्यावर मोर्चा नेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शिष्ट मंडळाला संबधितांवर योग्य ती कारवाही करू असे आश्वासन पोलिसांनी दिले असून विद्यार्थांना कार्वाहीची धमकी देणाऱ्या संबधित पोलीस अधिकार्यांना समाज देण्यात येईल असे कृष्णप्रकाश यांनी सांगितल्याचे रमेश जाधव यांनी सांगितले.
     
वाढीव फी परत करू - रामदास आठवले 
पीपल्सचे अध्यक्ष रामदास आठवले यांना याबाबत विचारले असता विद्यार्थांना न्याय मागण्याचा संपूर्ण अधिकार आहे, अशी वाढीव फी का घेतली, किती घेतली याची चौकशी करेन, विद्यार्थ्यांना अधिक घेतलेली फी परत करण्याचा प्रयत्न करू, विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करू, विद्य्र्थांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी माझे प्रयत्न असतील असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS