बेरोजगार सहकारी संस्थांना विनानिविदा कामे देण्यास पाठपुरावा करणार - अजित पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2012

बेरोजगार सहकारी संस्थांना विनानिविदा कामे देण्यास पाठपुरावा करणार - अजित पवार



मुंबई सहकारी बोर्डामार्फत आयोजित केलेल्या 8व्या विभागीय सहकार परिषदेनिमित्त 'सहकारी जीवन' या विशेषंकाचे प्रकाशन करते समयी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके, बोर्डाचे अध्यक्ष बी. डी. पारले, आ. विनायकराव मेटे, मुंबई बॅंकेचे संचालक नंदकुमार काटकर, वसंतराव देशमुख व अजय बागल आदी दिसत आहेत.?मुंबई : बेरोजगार आणि सेवा सहकारी संस्थांना विनानिविदा 25 लाखांपर्यंत कामे मिळावीत, यासाठी सहकार विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले. 

मुंबई सहकारी बोर्डामार्फत आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षानिमित्त आयोजित विभागीय सहकारी परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात अजित पवार बोलत होते. या सोहळ्यास सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष बी. डी. पारले, सहकार राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.सहकार चळवळ वाढवण्यासाठी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार चळवळ सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

सहकार चळवळीचे नेतृत्व हे तळमळीच्या, सचोटीच्या कार्यकत्र्यांकडे असावे, ते वारसा हक्काने कोणाकडे आलेले नसावे. सहकारामध्ये झालेल्या चुकांवर पांघरुण न घालता त्या दुरुस्त केल्यास चळवळ पुढे जात असल्याचे पवार यांनी सांगितले. सहकारी संस्थांमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये ताकद निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. सहकारी चळवळीस गतिमान करण्याचे काम सर्वाचे आहे. चळवळीस राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन त्या वेळी पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS