दूध न पचणाऱ्या विद्यार्थ्यांना थ्रेप्टिन बिस्किटे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2012

दूध न पचणाऱ्या विद्यार्थ्यांना थ्रेप्टिन बिस्किटे


मुंबई - दूधबाधेच्या टीकेतून सुटका करून घेण्यासाठी दूध न पचणाऱ्या विद्यार्थ्यांना थ्रेप्टिन बिस्किटे देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालकांकडून एक अर्जदेखील लिहून घेतला जाणार आहे. 

सुगंधी दुधाची विद्यार्थ्यांना वारंवार बाधा होत आहे. यावरून पालिका प्रशासन विरोधकांचे लक्ष्य बनल्यामुळे आता दूध पचवू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुधाऐवजी थ्रेप्टिन बिस्किटे देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही बिस्किटे आरोग्यास पोषक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना दूध देण्यापूर्वी पालकांकडून अर्ज लिहून घेण्यात येणार आहे. या अर्जात पालकाने त्याच्या पाल्याला दूध पचत असल्याचे लिहून दिल्यास, त्या विद्यार्थ्याला दूध देण्यात येणार येईल; अन्यथा त्यांना ही बिस्किटे देण्यात येतील. दुधाचे पचन हे व्यक्तीनुसार बदलत असल्याने योजनेला दोष देऊन उपयोग नाही. म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला असून, शिक्षण अधिकाऱ्यामार्फत हे अर्ज प्रत्येक शाळेत पाठविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS