घरगुती गॅसवर दिली जाणारी सबसिडी यापुढे थेटग्राहकांच्या बँ क खात्यावर रोख पैशांच्या स्वरुपात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे .सिलिंडरचा काळाबाजार आणि त्यामुळे होणारी सरकारी पैशाची गळती थांबविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे . येत्या १ एप्रिल पासून संपूर्ण देशात ही योजना राबविण्यात येणार आहे .
तेल कंपन्या , अर्थ व पेट्रोलियम मंत्रालय आणि 'आधार ' कार्ड प्राधिकरणाच्या अधिका- यांच्या संयुक्तबैठकीत हा निर्णय घेण्यात आला . त्यानुसार देशातील ज्या ५० जिल्ह्यांत आधार कार्डची सर्वाधिक नोंदणी झाली आहे , तेथील गॅस ग्राहकांना १ जानेवारीपासून रोख पैशांच्या स्वरुपात सबसिडी मिळेल . त्यानंतर १ एप्रिलपासून देशातील सर्व जिल्ह्यांत याची अमलबजावणी करण्यात येणार असून १ जुलैपर्यंत देशभरातील सर्व कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे .
अशी आहे योजना
* रोख सबसिडी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस सिलिंडर ग्राहकांना सर्वप्रथम स्वत: चा ' आधार' क्रमांक गॅस वितरक व पसंतीच्या बॅंकेकडे नोंदवावा लागेल .
* ग्राहकाचा ' आधार ' क्रमांक बॅंक आणि गॅस वितरकाला मिळाल्यानंतर सबसिडीची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यावर पडेल .
* सवलतीच्या दरातील सिलिंडरचा कोटा संपेपर्यंत सरकार ही रक्कम ग्राहकाच्या बॅंक खात्यावर जमाकरीत राहील . गॅस सिलिंडरची किंमत ९०० रुपये असेल तर सबसिडीच्या रुपात ४५० रुपये खात्यातजमा होतील .
* केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सहा सिलिंडरवरील सबसिडी व्यतिरिक्त राज्याने काही सबसिडी जाहीरकेली असेल तर त्याची रक्कमही ग्राहकांच्या बॅंक खात्यावर जमा होईल .
Post Top Ad
19 October 2012
Home
Unlabelled
गॅसवरील सबसिडी आता बॅंक खात्यात
गॅसवरील सबसिडी आता बॅंक खात्यात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment