‘बेस्ट’मधील महिला कर्मचार्‍यांना सहा महिन्यांची प्रसूती रजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2012

‘बेस्ट’मधील महिला कर्मचार्‍यांना सहा महिन्यांची प्रसूती रजा

मुंबई (प्रतिनिधी) -  ‘बेस्ट’ उपक्रमातील महिला कर्मचार्‍यांची प्रसूती रजा दुप्पट वाढवून सहा महिने करण्यात आली आहे. महिला कर्मचार्‍यांच्या प्रसूती रजेचा ९३ दिवसांचा कालावधी १८० दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या १ जानेवारी २०१३ पासून ही रजा लागू करण्यात येणार आहे.
बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष संजय पोतनीस यांनी १४ ऑक्टोबर २००८ रोजी बेस्ट समितीत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सहाव्या वेतन आयोगातील शिफारसीप्रमाणे महिला कर्मचार्‍यांना १८० दिवसांची भरपगारी प्रसूती रजा देण्याची सूचना केली होती. त्याची बेस्ट प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हा प्रस्ताव शुक्रवारी बेस्ट समितीत आणला. त्याला सदस्यांनी मंजुरी दिली. शिवसेना सदस्य सुनील गणाचार्य यांनी पालिका सेवेतील महिलांना २०१० पासून या रजेचा लाभ मिळत असल्याने बेस्टमधील महिला कर्मचार्‍यांना २०११ पासून या सेवेचा लाभ मिळायला हवा अशी सूचना केली. त्यावर बेस्ट महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS