मागास प्रवर्गाच्या जातवैधतेअभावी तांत्रिक खंड देऊन कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

मागास प्रवर्गाच्या जातवैधतेअभावी तांत्रिक खंड देऊन कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित होणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत जातवैधता प्रमाणपत्राअभावी तांत्रिक खंड देऊन नियुक्त झालेल्या ज्या कर्मचार्‍यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले आहे ते त्या-त्या जाती प्रवर्गाचे असल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांची संदर्भित पदावरील महापालिका सेवा त्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित करून त्यांना सेवा सातत्य अर्हकारी सेवा यासारखे नियमित सेवेचे सर्व अनु™ोय फायदे देण्यात येणार असल्याने अशा कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित होणार आहेत. परिणामी, सतत तांत्रिक खंड मिळणार्‍या कर्मचार्‍यांना या निर्णयामुळे मोठाच दिलासा मिळणार आहे. याबाबतचे स्पष्ट परिपत्रक पालिका शिक्षणाधिकार्‍यांनी काढले आहे.

मागासवर्गीयांच्या आरक्षित पदांवर जातवैधता प्रमाणपत्रांअभावी तांत्रिक खंड देऊन नियुक्त झालेल्या ज्या कर्मचार्‍यांनी अद्यापि जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही व ज्यांची महानगरपालिका सेवा जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यापेक्षा प्रत्येक सहा महिन्यांनी तांत्रिक खंड द्यावा व अशा प्रकारे ज्या कर्मचार्‍यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे, अशा कर्मचार्‍यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 9 डिसेंबर 2011 च्या परिपत्रकानुसार पुढे प्रत्येक सहा महिन्यांनी खंडित होणारी सेवा खंडित देऊन दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे, मात्र सवलत दिलेल्या दोन वर्षाच्या कालावधीत जर कर्मचार्‍याने जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांना त्यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याची बाब परिपत्रकात स्पष्ट करण्यात आली आहे.

ज्या कर्मचार्‍यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा कर्मचार्‍यांना जातवैधता प्रमाणपत्राकरिता आवश्यक कागदपत्रांसह दावा तयार करण्यासाठी तातडीने जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कर्मचार्‍यांची राहणार आहे. याबाबतचे स्पष्ट परिपत्रक पालिका शिक्षणाधिकार्‍यांनी काढले असून परिपत्रक इओआरपी/ओडी/294 दि. 7/9/2012 सर्व संबंधितांना कळवण्यात आले आहे. यामुळे जातवैधतेअभावी तांत्रिक खंड देऊन नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS