महिला सहकारी संस्था बाद करण्याचा पालिकेचा डाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2012

महिला सहकारी संस्था बाद करण्याचा पालिकेचा डाव

मुंबई : कंत्राटदारांचे भले करण्यात मग्न असणार्‍या पालिकेने गोरगरीब महिला सहकारी संस्थांचे शालेय पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट आंतरराष्ट्रीय कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचा हा निर्णय हाणून पाडण्यासाठी मुंबई व कोकण विभागीय महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था महसंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाच्या अध्यक्षा जयश्री पांचाळ यांनी दिला आहे.1985 पासून शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम करणार्‍या महिला सहकारी संस्थांच्या कारभारात जाणीवपूर्वक चुका काढून हे कंत्राट परदेशी कंपनीला देण्यासाठी पालिका नेमके कोणते हित पाहात आहे, ज्या महिला सहकारी संस्थांच्या चुका आहेत, त्यांना चौकशीअंती बाद करावे. सरसकट निर्णय कशासाठी? असा सवाल पांचाळ यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS