मुंबई : कामगारांच्या ज्वलंत प्रश्नावर देशभरातील 35 संघटनांनी फेब्रुवारी महिन्यात 20 आणि 21 रोजी संपाची हाक दिली आहे.मध्य रेल्वेच्या वेल्फेअर सभागृहात कामगार संघटनांच्या पार पडलेल्या बैठकीत संप यशस्वी होण्यासाठी चर्चा करण्यात आली.भाववाढ, बेरोजगारी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, सर्व कामगारांना पेन्शन यासहित राष्ट्रीय पातळीवरील 10 मागण्या आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रेशनिंग व्यवस्थेमार्फत करा, अत्यावशक सेवा कायदा रद्द करा, या मागण्यांसाठी संप पुकारण्यात येणार आहे. संपाच्या अगोदर सरकारला जागे करण्यासाठी 18 आणि 19 डिसेंबर रोजी सत्याग्रह, जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगार संघटना कृती समितीच्या मुंबई विभागाचे संयुक्त निमंत्रक ए. डी. गोलंदाज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. बीएमएच, एचएमएस, भारतीय कामगार संघटना, एनटीआय, इंटक, आयटक, सीटू, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि इतर कामगार संघटनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Post Top Ad
22 October 2012
Home
Unlabelled
कामगार संघटनांची देशव्यापी संपाची हाक
कामगार संघटनांची देशव्यापी संपाची हाक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment