मुंबई : मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची कबुली गुरुवारी पालिका प्रशासनाकडूनच स्थायी समितीत दिली गेली. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, गेल्या वर्षी 416 रुग्ण होते. त्याच्या तुलनेत या वर्षी 647 रुग्ण मुंबईतील पालिका रुग्णालयांतून आढळल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली. यावर डेंग्यूची साथ रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले. पावसाळय़ानंतर डेंग्यूचा प्रादूर्भाव होत असतो. डेंग्यूचे डास दिवसा चावतात त्यामुळे कामावर असतानाही डास चावल्याने हा रोग होऊ शकतो. हे डास भंगार सामानात तसेच झाडांवर आढळतात. डेंग्यूच्या रुग्णाला ताप येतो. हा ताप रक्तात पसरला तर रक्तातील पांढर्या पेशींचे प्रमाण होते आणि रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते, असे अडतानी यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्पष्टीकरण देताना मुंबईत आतापर्यंत डेंग्यूने तीन जण मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट केले. यामध्ये खाजगी रुग्णालयांचा समावेश नसल्याचे सांगत अडतानी यांनी 'प्लेट लेसची' कमतरता नसल्याचेही स्पष्ट केले. मुंबईत सर्वात जास्त डेंग्युच्या केसेस 'ई' वॉर्डमध्ये असून येथे 126 रुग्ण आढळल्याचे सांगत सर्वात कमी रुग्ण आर सेंटर येथे केवळ तीन रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. डेंग्यूला आळा घालण्यासाठी धूम्रफवारणी सुरू असून, मलेरिया निर्मूलनाप्रमाणे यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचे अडतानी यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता डेंग्यू रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करून व यासंदर्भातील संपूर्ण माहिती पुढील बैठकीत सादर करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.
Post Top Ad
19 October 2012
Home
Unlabelled
मुंबईत डेंग्यूची साथ पालिका प्रशासनाची कबुली
मुंबईत डेंग्यूची साथ पालिका प्रशासनाची कबुली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment