मुंबई : मुंबईच्या हद्दीत जन्म झालेल्या प्रत्येक नागरिकांना यापुढे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जन्म प्रमाणपत्राची पहिली प्रत मोफत देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव बुधवारी होण्यार्या स्थायी समितीत येणार असून त्याला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यानंतर पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अँड. मनमोहन चोणकर यांनी 24 फेब्रुवारी 2011 रोजी पालिका सभागृहात मुंबईत जन्म झालेल्या प्रत्येकास पालिकेच्या वतीने जन्म प्रमाणपत्राची प्रत विनामूल्य देण्याची मागणी एका ठरावाद्वारे केली होती. यावर आपला अभिप्राय देताना पालिका प्रशासनाद्वारे सांगितले की, सध्या जन्माची संगणकीय प्रमाणपत्रे विहित शुल्क आकारून दिली जातात. पहिल्या संगणकीय प्रतिसाठी 22 रुपये आकारले जातात व नंतरच्या सर्व प्रतिसाठी 20 रुपये आकारले जातात. पालिका हद्दीच्या क्षेत्रात वर्षाकाठी अंदाजे 1 लाख 80 हजार ते 1 लाख 85 हजार इतक्या जन्माच्या घटना होतात. त्यामुळे जन्म प्रमाणपत्र नि:शुल्क दिल्यास जन्म प्रमाणपत्राच्या पहिल्या प्रतिला रुपये 22 प्रमाणे साधारणपणे 39 लाखांचा पालिकेचा महसूल बुडतो. त्यामुळे जन्म प्रमाणपत्राची पहिली प्रत नि:शुल्क देताना त्यानंतरच्या प्रत्येक प्रतिसाठी 30 रुपये आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
Post Top Ad
19 October 2012
Home
Unlabelled
पालिकेकडून मिळणार जन्म प्रमाणपत्राची पहिली प्रत मोफत
पालिकेकडून मिळणार जन्म प्रमाणपत्राची पहिली प्रत मोफत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment