मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवासात भेडसावणार्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी मध्य रेल्वे मुख्यालयात खासदारांची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. प्लॅटफार्मची उंची वाढवणे, तिकीट खिडक्या, महिला प्रसाधनगृह, कल्याणच्या पुढे जलद लोकल या आणि इतर असंख्य व्यथा या वेळी खासदारांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांपुढे मांडल्या.
खा. संजीव नाईक, खा. संजय पाटील, खा. आनंद परांजपे, खा. भरतकुमार राऊत, खा. एकनाथ गायकवाड, खा. सुरेश टावरे या बैठकीस उपस्थित होते. एटीव्हीएम मशिनचा वापर वाढावा म्हणून रेल्वेने सीव्हीएम कूपन रांगेत देण्याचा निर्णय घेतला, मात्र यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बहुतेक स्टेशनवर नादुरुस्त असलेल्या एटीव्हीएम मशीन दुरुस्त कराव्यात, अशी मागणी या वेळी खासदारांनी केली. चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड प्रकल्पामुळे भविष्यात रेल्वेवरील ताण कमी होणार आहे.या प्रकल्पांबरोबर सीएसटी-कल्याण एलिव्हेटड प्रकल्पास प्राधान्य द्यावे, असा मुद्दा या वेळी खासदारांनी उपस्थित केला. हा प्रकल्प बाळगण्यात आला असला तरी किमान प्रकल्पावर रेल्वेने लक्ष द्यावे, अशी मागणी परांजपे यांनी केली. ठाणे आणि कल्याण स्थानकातून मध्य रेल्वेस मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळते,मात्र त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. उपनगरीय स्थानकांवर महिलांसाठी प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते, हा मुद्दा या वेळी खासदारांनी उपस्थित केला. प्रत्येक स्टेशनवर यापुढे पुरुषांच्या प्रसाधनगृहाशेजारीच महिलांसाठी सोय करण्यात येणार आहे. या प्रसाधनगृहाचा दर्जा चांगला राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच महिलांचे किमान एक स्वच्छतागृह नि:शुल्क ठेवण्यासाठी रेल्वे विभाग जातीने लक्ष देईल, असे आश्वासन या वेळी वरिष्ठ अधिकार्यांनी दिले. ठाणे आणि कल्याण स्थानकातीलवाढती गर्दी पाहता फूट ओव्हरब्रिज बांधण्याबरोबर सरकते जिने बसवण्यात येतील, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी खासदारांना सांगितले.
Post Top Ad
19 October 2012
Home
Unlabelled
खासदारांनी मांडल्या रेल्वे प्रवाशांच्या व्यथा
खासदारांनी मांडल्या रेल्वे प्रवाशांच्या व्यथा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment