मुंबई : देशामध्ये ज्यावेळी सत्ताधार्यांवर अंकुश ठेवायला विरोधक नव्हते त्यावेळी पत्रकार विरोधकांची भूमिका पार पाडत होते. मात्र आता सत्ताधारी, विरोधक व काही पत्रकार एकच भूमिका पार पाडताना दिसत आहेत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी शुक्रवारी प्रेस क्लब येथे व्यक्त केले. प्रेस क्लबच्या वतीने 'पत्रकार व राजकीय पुढारी' या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नय्यर बोलत होते. लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. त्याची चौकशी व्हावी. त्यानंतर सत्य बाहेर येईल. पत्रकारांचे स्वातंर्त्य सध्या हिरावून घेतले जात आहे. त्यासाठी मालकांनी वर्षाचे बजेट संपादकांच्या हाती द्यावे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वर्षभराचा कार्यक्रम ठरवावा. मालकांनी त्यात हस्तक्षेप करू नये. त्यानंतरच घसरलेला अगल्रेखांचा दर्जा वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Post Top Ad
20 October 2012
Home
Unlabelled
पत्रकार स्वत:चे कर्तव्य विसरलेत
पत्रकार स्वत:चे कर्तव्य विसरलेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment