"अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या वाढवा' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2012

"अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या वाढवा'


मुंबई- पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यातच अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्‍किल झाले आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. तसे न झाल्यास संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी आज दिला. महागाईविरोधात संघटनेतर्फे दादर रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या निदर्शनादरम्यान ते बोलत होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS