६८ टक्के दुधात भेसळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2012

६८ टक्के दुधात भेसळ


रोजच्या आहारातला अविभाज्य घटक असलेल्या दुधात भेसळीचा खडा मिसळण्यात येत असल्याची धक्कादायक कबुली आता केंद्र सरकारनेच दिली असून देशातील ६८ टक्के दुधाचा दर्जा अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) निकषांची पूर्तता करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्राने सुप्रीम कोर्टात सादर केले आहे. 


भेसळयुक्त दुधाबाबत एका जनहित याचिकेप्रकरणी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी एफएसएसएआयच्या सन २०११मधील सर्वेक्षणाचा दाखला देण्यात आला असून ६८ टक्के भेसळयुक्त दुधापैकी ६६ टक्के दूध हे सुटे विकले जाणारे होते असेही सरकार म्हणते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS