मुंबई : मुंबई महानगरपालिका शाळेमधील तसेच खाजगी अनुदानित शाळेतील 9 लाख विद्यार्थ्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार गेल्या कित्येक वर्षापासून दिला जात आहे. मुंबईत सुमारे 400 महिला या माध्यमातून कार्यरत असून मात्र पालिका प्रशासन हेच काम आंतरराष्ट्रीय परदेशी संस्था असलेल्या 'इस्कॉन' व दुसर्या राज्यातल्या 'अक्षयधाम' या कंपनीस देण्याचा घाट घालत असल्याचे समजते. या निर्णयामुळे मुंबईतील मध्यवर्गीय मराठी महिलांच्या सुमारे 7 -8 हजार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येईल. या महिलांमध्ये अधिकतर महिला या गिरणी कामगारांच्या घरातील असून त्यांच्यावर दुसर्यांदा उद्ध्वस्त होण्याचा प्रयोग ओढवेल. याचा विचार करून शालेय पोषक आहाराच्या माध्यमातून खिचडी देण्याचे काम याच महिला संस्थांना देण्यात यावे, अशी मागणी मुंबई व कोकण विभागीय महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था महासंघाने राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांना प्रत्यक्ष भेटून केले आहे. याबाबत आपण येत्या मंगळवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करू, असे आश्वासन पिसाळ यांनी दिले आहे.
Post Top Ad
20 October 2012
Home
Unlabelled
'ती' योजना महिला संस्थांमार्फत राबविण्याची मागणी
'ती' योजना महिला संस्थांमार्फत राबविण्याची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment