थोर व्यक्तींच्या पुतळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2012

थोर व्यक्तींच्या पुतळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई


मुंबई - समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले. मुंबईत १२५ ठिकाणी असे पुतळे असून त्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे तसेच त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करण्याचे निर्देश महापौर सुनील प्रभू यांनी आज प्रशासनाला दिले.

फोर्ट परिसरातील फ्लोरा फाऊंटनच्या सुशोभिकरणाबाबत नगर अभियंत्यांनी आज महापौरांसमोर एक सादरीकरण केले. यावेळी पुतळ्यांच्या स्वच्छतेबाबतही महापौरांनी माहिती घेतली. यावेळी फ्लोरा फाऊंटन येथील पुतळ्याची साफसफाई तीन वर्षांपूर्वी झाल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत वर्षातून दोनदा पुतळ्यांची सफाई शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
फ्लोरा फाऊंटन तसेच हुतात्मा चौक परिसराचे सुशोभिकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे असे महापौरांनी प्रशासनाला सांगितले. यानुसार या परिसरात हिरवळ विकसित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथील कारंजी तसेच पुतळ्यांचे संवर्धन करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात यावा, असे महापौर म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS