..अन्यथा पालिकेच्या प्रमुख लेखापालांनी राजीनामा द्यावा - शेवाळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2012

..अन्यथा पालिकेच्या प्रमुख लेखापालांनी राजीनामा द्यावा - शेवाळे


महानगरपालिकेचे प्रमुख लेखापाल राम धस यांच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नगरसेवकांची कामे अजून आहेत. त्यातच राम धस यांनी कंत्राटदार आणि नगरसेवकांच्या साटेलोटय़ातूनच भ्रष्टाचार फोफावत असल्याचा आरोप अंतर्गत अहवालात केला होता. याबाबत त्यांनी आपल्याकडे कंत्राटदारांची पत्रेही असल्याचा उल्लेख केला होता, मात्र शुक्रवारी स्थायी समितीत धस यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान देत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी नाही तर प्रशासनाने त्यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा द्यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

वॉर्डमधील स्थापत्य कामे करण्यासाठी नेहमीच सीडब्ल्यूसी कंत्राटदारांनी आपल्याकडे अनेक नगरसेवकांच्या तक्रारी केल्या आहेत आणि त्यामुळेच पालिकेत भ्रष्टाचार वाढला असल्याचा आरोप राम धस यांनी केला होता. त्यावर काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत धस यांनी हे नगरसेविकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत याबाबत त्यांनी आरोप सिद्ध करावे, असे सांगितले होते. शुक्रवारी स्थायी समितीत अनेक नगरसेवकांनी राम धस यांच्या कार्यपद्धतीवर ताशोरे ओढले. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सीडब्ल्यूसी ठेकेदार विभागातील कामे होत नसल्याचा आरोप केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी ज्या फाईलवर रिमार्क मारले गेले ते अक्षर धस यांचेच आहे का हे तपासा व त्याची चौकशी करा, असे सांगत धस यांनी नगरसेवकांवर केलेला आरोप सिद्ध करावा; अन्यथा राजीनामा द्यावा, असे निर्देश दिले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS