मुंबई : मुंबई मनपाच्या खड्डे बुजवण्याच्या संगणक प्रणालीत असलेले दोष अभियंत्यांनी वारंवार पालिकेच्या अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले आहेत;परंतु संगणक प्रणालीचे कर्मचारी अतिरिक्त आयुक्तांचे नाव घेत अभियंत्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अभियंत्यांची पंचाईत होत आहे.
या पावसाळ्यात संगणकीय प्रणालीचा पहिल्यांदाचा वापर करण्यात आला असल्यामुळे त्यातील बरेच दोष दूर करता आले नाहीत. त्यामुळे खड्डे बुजवण्याप्रकरणी अभियंत्यांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये आणि तरीही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीयर्स युनियनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिला आहे.
पालिकेतील रस्ते विभागातील 110 पैकी 97 अभियंत्यांना खड्डे बुजविण्याच्या कामात हयगय केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला आर्थिक दंड चुकीचा असल्याचे राजाध्यक्ष यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये खड्डे बुजविण्याचे काम संगणक प्रणालीद्वारे करणे सोपे नाही. यामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक बाबींचा समावेश आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाळ्यात पडणार्या खड्डय़ांची दुरुस्ती करण्याचे नेमके तंत्रज्ञान अद्यापही प्रशासनास ठरवता आले नाही. अशी परिस्थिती असताना दुय्यम अभियंत्यांना दोषी ठरवून दंड ठोठावणे उचित होणार नाही, असे राजाध्यक्ष यांनी सांगितले.
Post Top Ad
19 October 2012
Home
Unlabelled
अभियंत्यांना दंड केल्यास न्यायालयात जाऊ
अभियंत्यांना दंड केल्यास न्यायालयात जाऊ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment