पालिका प्रशासनावर परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2012

पालिका प्रशासनावर परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की

मुंबई : पालिकेच्या करनिर्धारक व संकलन खात्यातील कर्मचार्‍यांना परीक्षा उत्तीर्ण होऊनही बढती न देता पुन्हा याच पदाकरिता परीक्षा घेण्यासाठी परिपत्रक प्रशासन कसे काय काढू शकते? असा सवाल करत मनसेचे सदस्य चेतन कदम यांनी हे परिपत्रक प्रशासनाने त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी जोपर्यंत चेतन कदम यांनी गेल्या स्थायी समितीत उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्दय़ावर प्रशासनाकडून उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत हे परिपत्रक मागे घ्यावे, असे आदेश दिले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS