टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी विलास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी विलास आठवले

मुंबई - टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी विलास आठवले निवडून आले. तर सरचिटणीसपदी प्रसाद काथे निवडून आले आहेत.
 
टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत (२०१२-२०१४) उपाध्यक्षपदी अतुल कदम, सहायक चिटणीसपदी मनीष शिरीषकर, खजिनदार पदावर प्रविण पाटील यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मयूर परीख, राजेश खाडे, प्रदीप पांडे, विमल सिंग, समीर चवरकर आणि निजामुद्दीन शेख यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी विलास आठवले, कमलेश सुतार, शशिकांत सांडभोर, सचिन परब यांच्यात लढत झाली. एकूण २२५ सदस्यांपैकी १८३ जणांनी मतदान केले. विलास आठवले ७८ मते मिळवून विजयी झाले. तर सरचिटणीसपदासाठी प्रसाद काथे आणि सुधाकर कांबळे यांच्यात लढत झाली. प्रसाद काथे १५० मते मिळवून विजयी झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS