बिग बॉसमधून असीमला काढा - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2012

बिग बॉसमधून असीमला काढा - रामदास आठवले


भारतीय राज्यघटना अशोक चक्र णि सार्वभौम संसदेचा अवमान करणाऱ्या कार्टूनिस्ट असीम त्रिवेदीची बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये निवड झाल्यामुळे दलित जनतेत तीव्र नाराजी असल्याचे सांगूनत्रिवेदींना त्या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात यावाअन्यथा लर चॅनल्सच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिला 


अण्णा हजारे यांच्या वांद्रे - कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावरील आंदोलनाकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली. मात्र , त्याच मैदानात तथाक​थित इंडिया अग्नेस्ट करप्शन संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या असीम त्रिवेदीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली भारतीय राज्यघटनेचा घोर अपमान केला . असीमने काढलेल्या व्यंगचित्राबाबत दलित समाजात संतापाची तीव्र भावना असल्याचे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. 

बॉम्बे डायींग या कंपनीने भगवान बुद्धांचे चित्र बेडशिट छापले आहे. यावर बोलताना कोणत्या कंपन्यांनी काय छापावे याबाबत सरकारने आचारसंहिता बनवावी अशी मागणी यावेळी आठवले यांनी केली.

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी दादरच्या चैत्यभूमीनजीक इंदूमिलची साडेबारा एकर जागा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अक्षम्य चालढकल करीत असल्याच्या आरोपाचही आठवलेंनी पुनरुच्चार केला. सरकारच्या त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा पुन्हा देत, चेंबूरच्या आंदोलनात शिवसेनेचे नेतेसुभाष देसाई, भाजप नेते विनोद तावडे सहभागी होणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS