काश्मीर खोर्‍यातील विद्यार्थी मुंबईच्या दौर्‍यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2012

काश्मीर खोर्‍यातील विद्यार्थी मुंबईच्या दौर्‍यावर

मुंबई : दहशतवादाची छाया, नेहमीच लष्कराची परेड या वातावरणात दिवस काढणारे काश्मीर खोर्‍यातील विद्यार्थी सध्या मुंबईच्या दौर्‍यावर निवांत क्षणांचा अनुभव घेत आहेत. काश्मीर खोर्‍यातील विद्यार्थ्यांना देशाच्या इतर भागांविषयी माहिती मिळून आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने लष्कराने सद्भावना अर्थात 'पैग-ए-अमन' या शैक्षणिक आणि प्रेरणादायी मोहिमेचे आयोजन केले आहे. जम्मू-काश्मीरमधील बांदिपूर जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यांचा या चमूत समावेश आहे. गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटाच्या गुंफा, नेहरू तारांगण, हाजीअली यासहित मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तूंना विद्यार्थी येत्या काही दिवसांत भेट देणार आहेत. मुंबईत आल्यावर एका वेगळ्याच जगाचा अनुभव त्यांना येत असल्याचीप्रतिक्रिया चमूतील काही विद्यार्थ्यांनी दिली. मुंबईनंतर पुणे आणि बंगळुरूला विद्यार्थी भेट देणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS