नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या 22 तारखेपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात तब्बल 100 विधेयकांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यात भूमी अधिग्रहण, लोकपाल आणि पदोन्नत्यांमध्ये आरक्षण हे विधेयकसुद्धा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनात पंतप्रधानांनी कोळसा घोटाळय़ाच्या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे, या मागणीवर विरोधक अडून बसले होते. कोळसा घोटाळय़ात पंतप्रधानांचा कथित समावेश असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. त्यामुळे पावसाळी अधिवेशन शांततेत चालू शकले नव्हते. परिणामी तब्बल 100 विधेयके पल्रंबित राहिले होते. यात अनेक महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत विषयांवरील विधेयकांचा समावेश आहे. व्हिसल ब्लोअर सुरक्षा विधेयक, लोकपाल व लोकायुक्त विधेयक, भूमी अधिग्रहण, आर्थिक गैरव्यवहार, कंपनी आणि बँकिंग, न्यायालयीन उत्तरदायित्व विधेयक, परदेशी शिक्षण संस्थान विधेयक, कार्यालयात महिलांसोबत गैरवर्तन आणि उत्खनन यासारख्या विधेयकांचाही यात समावेश आहे. त्यामुळे ही सर्व विधेयके हिवाळी अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.
Post Top Ad
20 November 2012
Home
Unlabelled
संसदेचे हिवाळी अधिवेशन 22 नोव्हेंबरपासून
संसदेचे हिवाळी अधिवेशन 22 नोव्हेंबरपासून
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment