मुंबई : भायखळा येथील अण्णाभाऊ साठय़े खुले नाटय़गृह विकसित करण्यास पालिकेकडून विलंब होत असल्याचा प्रश्न राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सोमवारी पालिकेत उपस्थित केला. राज्य सरकारने हे नाटय़गृह उभारण्यासाठी निधी दिला आहे. पालिकेने ही निधी मंजूर केला आहे, मात्र प्रत्यक्षात अद्यापि एकही पैसा खर्च केला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाला हे नाटय़गृह उभारण्यात रस नसल्याचेच दिसून येत असल्याचा आरोप पिसाळ यांनी केला आहे.
जिजामाता उद्यानातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठय़े खुले नाटय़गृह उभारण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंर्त्यांनी मंत्रालयात घेतलेल्या सभेत आयुक्त उपस्थित होते. हे नाटय़गृह विकसित करण्यासाठी जवळपास 12.47 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष साहाय्य विभागाकडून यापैकी 6.14 कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार, राज्य सरकारने तीन कोटी रुपये मंजूर केले होते. पालिकेने वर्ष 2005-06 ते 2011-12 या कालावधीत प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या मुद्दय़ावर राज्याचे अर्थमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी विनंती पिसाळ यांनी केली आहे.
Post Top Ad
20 November 2012
Home
Unlabelled
अण्णाभाऊ साठय़े खुले नाटय़गृह विकसित करण्यास पालिकेकडून विलंब
अण्णाभाऊ साठय़े खुले नाटय़गृह विकसित करण्यास पालिकेकडून विलंब
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment