| नवी दिल्ली : देशाचा सर्वागीण विकास व्हावा, या उद्देशाने सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. संबंधित यंत्रणेकडून या योजना जबाबदारीने पारदर्शकपणे राबविणे काळाची गरज बनली असल्याचे मत सीबीआयचे विशेष निदेशक व्ही. के. गुप्ता यांनी व्यक्त केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी द्वितीय इंटरपोल जागतिक कार्यक्रमाचे उद्घाटन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मालदिव, मलेशिया, फिजी, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, भुतान, नेपाळसह इंटरपोलच्या अधिकार्यांची विशेष उपस्थिती होती. या अधिकार्यांना संबोधित करताना गुप्ता म्हणाले, विकास योजना राबविणार्या काही यंत्रणा या विश्वास ठेवणार्या नसतात. सातत्याने अशा यंत्रणेकडून राबविणारी प्रक्रिया जटिल, अपारदर्शी, केंद्रीयकृत आणि विशेष अधिकाराची असते. त्या यंत्रणेकडून राबविल्या जाणार्या योजनेत मात्र हमखास भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येते.भ्रष्टाचार करताच येणार नाही, अशा प्रकारे विकास योजनांचे मॉडेल असणे गरजेचे आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. विकास योजना राबविण्याअगोदर कायदा लागू करणार्या संबंधित संस्थेसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. जेणेकरून योजनेत भ्रष्टाचार करण्याचा संबंधित यंत्रणेचा मार्गच बंद होईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रकुल, टू-जी स्पेक्ट्रमसह अन्य घोटाळय़ांची चौकशी सुरू असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला. |
Post Top Ad
20 November 2012
Home
Unlabelled
सरकारी योजना पारदर्शकपणे राबवा - सीबीआयची तंबी
सरकारी योजना पारदर्शकपणे राबवा - सीबीआयची तंबी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment