पालिका शिक्षकांना विनाविलंब निवडश्रेणी लागू करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2012

पालिका शिक्षकांना विनाविलंब निवडश्रेणी लागू करा


मुंबई : पालिका शिक्षण विभागात 24 वर्षे शिक्षक म्हणून सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देय असतानादेखील केवळ प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे निवडश्रेणीनुसार वेतन मिळण्यास आधीच तब्बल 4 वर्षाचा विलंब झाला आहे. त्यामुळे लेखापरीक्षण व गोपनीय अहवालाच्या नावाखाली निवडश्रेणी देण्यास टाळाटाळ न करता ती 24 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना विनाविलंब देण्यात यावी, जेणेकरून सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्यांना त्याचा त्वरित फायदा मिळू शकेल, अशी स्पष्ट मागणी एका लेखी पत्राद्वारे शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांनी पालिका शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.

महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (12 वर्षे सेवा झालेल्यांना) व त्या अनुषंगाने थकबाकी मिळाली आहे. ज्या शिक्षकांची सेवा 24 वर्षे पूर्ण झालेली आहे, अशांना निवडश्रेणी त्याचवेळी द्यावयास हवी होती; परंतु प्रशासनाच्या आडकाठीमुळे ते होऊ शकले नाही. निवडश्रेणीसाठी 24 वर्षे नोकरीची अट असल्याने सन 2008 ला ज्या शिक्षकांनी नोकरीची 24 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांची यादी चार वर्षाच्या विलंबानंतर मागील दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली; परंतु दुर्दैवाने प्रशासनाच्या प्रचंड अनास्थेमुळे त्याची अंमलबजावणीच होऊ शकली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS