नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्ताने सरकारने विद्यार्थ्यांना सर्वात मोठी भेट दिली आहे. शिक्षण दिनाचे औचित्य साधून रविवारी 'आकाश-2' टॅब्लेट अपडेटेड व्हर्जनचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विज्ञान भवनात सादरीकरण करण्यात आले.नवीन 'आकाश-2' 1132 रुपयांमध्ये मिळणार आहे. यासाठी भारत सरकारने अनुदान पुरवले आहे. डिसेंबरपर्यंत एक लाख विद्यार्थ्यांना या टॅब्लेटचे वाटप करण्यात येईल, असा दावा आकाशची निर्मिती करणार्या डाटाविंड कंपनीने केला आहे. पहिल्या 'आकाश'मध्ये दोष आढळल्यानंतर हा प्रकल्प सुधारित व्हर्जनसाठी आयआयटीमधील कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनीयरिंग विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर अपडेटेड व्हर्जनचा आकाश आणण्यात आला. आकाशचे नवे व्हर्जन ओपन सोर्स अँप्लिकेशन ओएस अँड्रॉएड 4.0.3 ने संचलित आहे, तर यात कोरटेक्स प्रोसेसर बसविण्यात आला आहे, तर यातील रॅम क्षमता 512 एमबी करण्यात आली आहे. याआधीच्या व्हर्जनमध्ये ती 256 एमबी होती. तसेच वायफाय नेटवर्क असून, याची बॅटरी क्षमता 3 हजार एमएएच आहे. त्यामुळे किमान सहा ते सात तास हा टॅब्लेट चालेल.आकाशव्यतिरिक्त बाजारात पाच हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत किमतीचे टॅब्लेटही उपलब्ध आहेत.
Post Top Ad
12 November 2012
Home
Unlabelled
1132 रुपयांना मिळणार नवा आकाश
1132 रुपयांना मिळणार नवा आकाश
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment