पोलीस दोषी आढळल्यास कारवाई करणार-आर.आर.पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2012

पोलीस दोषी आढळल्यास कारवाई करणार-आर.आर.पाटील

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या दिवशी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला होता. यासंदर्भात फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी दोन मुलींना पोलिसांनी अटक केली होती.या प्रकरणाचा चौकशी अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून यात जर कोणी पोलीस कर्मचारी दोषी आढळले असेल तर त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केले.

फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या पालघरच्या शाहीन धडा आणि तिची कमेंट लाईक करणार्‍या रेणू श्रीनिवासन या दोघींना पोलिसांनी अटक केली होती.त्याचे देशभरात पडसाद उमटले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात कोणी पोलीस कर्मचारी दोषी आढळले असतील तर त्यांच्यावर मुख्यमंर्त्यांशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असे आर.आर.पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS