आपत्कालीन व्यवस्थापनात जनतेचा सहभाग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2012

आपत्कालीन व्यवस्थापनात जनतेचा सहभाग

मुंबई : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यास सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास 'आपत्कालीन व्यवस्थापनात जनतेचा सहभाग' या विषयावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एनसीटीटीसी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टन्टच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

मानवनिर्मिती किंवा नैसर्गिक संकट ओढावल्यास सर्व संबंधित यंत्रणांवर ताण येतो,मात्र योग्य सुनियोजनाद्वारे या काळात परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. यासाठी रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीतील उपायोजनांबाबत नेहमीच जागृत राहिले पाहिजे. त्या दृष्टीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 2008 मध्ये दहशतवाद विरोधी फोरमची स्थापना करण्यात आली होती. या कठीण परिस्थितीत प्राथमिक उपचार पथकाने घटनास्थळावर पोहचण्यापूर्वी स्थानिक जनतेचा आपत्कालीन व्यवस्थापनात सहभाग, रुग्णालयातील प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन परिस्थितीत कराव्या लागणार्‍या उपाययोजना, सरकार आणि पोलीस यंत्रणांना सहाय्य करणे, डॉक्टरांसाठी नियमावली तयार करणे, पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, रुग्णांवर उपचारानंतर मार्गदर्शन करणे या सर्व बाबींचा फोरममध्ये समावेश आहे. बॉम्बे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. एस. जयराम, शस्त्रक्रिया विभागातील वरिष्ठ डॉ. एम. एम. बागनी, ऑल इंडिया अँण्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा, 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले झरना नारंग आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS