मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ होत असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आता दिल्लीत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदान येथून जंतरमंतरवर मोर्चा काढणार असल्याचे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले.
दादर येथील इंदू मिलची 12 एकर जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळावी, अशी तमाम आंबेडकरी जनतेची मागणी आहे. यासाठी गेल्या दहा महिन्यांपासून राज्यात अनेक आंदोलने झाली, परंतु केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात असणा-या या जमिनीचा ताबा अजूनही राज्याला मिळालेला नाही. या जमिनीसाठी रिपाइंने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. दोन वेळा जेल भरो आंदोलनही करण्यात आले. मात्र, तरीही सरकार आमच्या भावनांची दखल घेत नाही. त्यामुळे या प्रश्नी पंतप्रधान व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता दिल्लीत धडक मारण्याचा निर्णय रिपाइंने घेतला आहे.
या आंदोलनाच्या तयारीसाठी बुधवारी रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील आंदोलनात इंदू मिलच्या जागेप्रमाणेच मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, एफडीआयचा निर्णय मागे घ्यावा, भूमिहीनांना जमीन वाटप करावी आणि स्वयंपाकाच्या गॅसचे 12 सिलिंडर सबसिडीने द्यावेत आदी मागण्या करण्यात येणार आहेत.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन तीन आठवडे चालवण्याची परंपरा होती, परंतु मागच्या दहा वर्षांपासून हे अधिवेशन आठ दिवसांत गुंडाळण्यात येत आहे. हे अधिवेशन पूर्वीप्रमाणे तीन आठवडे चालवावे या मागणीसाठी अधिवेशन काळात नागपूरच्या विधिमंडळावर रिपाइं मोर्चा काढणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली.
Post Top Ad
08 November 2012
Home
Unlabelled
इंदू मिलच्या जागेसाठी रिपाइंची दिल्लीत धडक देऊः रामदास आठवले
इंदू मिलच्या जागेसाठी रिपाइंची दिल्लीत धडक देऊः रामदास आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment