राजकीय नेत्यांच्या नावे आणि शस्त्रांच्या धाकावर जकात चोरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2012

राजकीय नेत्यांच्या नावे आणि शस्त्रांच्या धाकावर जकात चोरी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जकात नाक्यावर जकात माफियांनी उच्छांद मांडला आहे. हे जकात माफिया राजकीय नेत्यांच्या नावावर आणि कर्मचार्‍यांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत जकात चोरी करत असल्याची कबुली पालिकेने स्थायी समितीच्या बैठकीत निवेदनाद्वारे दिली आहे. 

मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे जकात चोरी असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या निवेदनावर अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांची स्वाक्षरी आहे.मनपाचे मुलुंड(प.), मुलुंड(पू), दहिसर, मुलुंड-एैरोली आणि वाशी येथे जकात नाके आहेत. या जकात नाक्याशिवाय पश्चिम रेल्वेमार्गावरील मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस जकात कार्यकेंद्र आणि अन्य जकात संकलन केंद्रांवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातर्फे अतिरिक्त 70 सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतचे निवेदन बुधवारी अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले होते. या निवदेनातच प्रशासनाने जकात केंद्रावर विविध जकात माफियांच्या टोळय़ा सक्रीय असून, मोठय़ा प्रमाणावर जकात चोरी होत असल्याचे म्हटले आहे. कर्मचार्‍यांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून राजकीय पक्षाचे नाव घेऊन धमकावत जकात चोरी करत असल्याचे म्हटले आहे. जकात चोरी माफियांच्या गाडय़ांचा पाठलाग केल्यास कर्मचार्‍यांच्या जीवाला धोका होतो. त्यामुळे कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण होते. त्याचा परिणाम होऊन जकात संकलन कमी होऊन जकातीचे उद्दिष्ट पार करता येत नसल्याची कबुली प्रशासनाने निवेदनात दिली आहे. जकात नाक्यावर पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जानेवारीपासून 235 सुरक्षा रखक नियुक्त केले आहेत. आता आणखी 70 बिनशस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे.त्यामुळे कर्मचार्‍यांचे ढासळलेले मनोधैर्य वाढेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS