मुंबई : भीम कायदा या संस्थेचे अध्यक्ष राम पंडागळे राष्ट्रवादीत नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे न जाता रिपाइंत यावे, असे स्पष्ट मत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार संघ येथे व्यक्त केले. रिपाइंची ओबीसी आघाडी स्थापन झाल्यानंतर ओबीसी समाजाचे पी. बी. कुंभार यांना अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आठवले या वेळी बोलत होते. ओबीसींची लोकसंख्या 52 टक्के आहे. म्हणजे 7 कोटीपेक्षा जास्त आहे. या समाजाचे अनेक प्रश्न पल्रंबित आहेत. त्यासाठी रिपाइं प्रयत्न करणार आहे, असे आठवले म्हणाले. 2 डिसेंबरला पुण्यात ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यावेळी या समाजाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती भूमिका देण्यात येईल. राम पंडागळे हे राष्ट्रवादी पक्षात नाराज आहेत. त्यांना मी रिपाइंत येण्याचे आवाहन करत आहे. ते माझे जुने मित्रही आहेत. रिपाइंत त्यांना योग्य न्याय मिळेल, असे आठवले म्हणाले.
Post Top Ad
09 November 2012
Home
Unlabelled
राम पंडागळे यांनी रिपाइंत यावे - आठवले
राम पंडागळे यांनी रिपाइंत यावे - आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment