केबल क्षेत्रातील एकाधिकारशाही थांबवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2012

केबल क्षेत्रातील एकाधिकारशाही थांबवा

सरकारची 'ट्राय'ला सूचना
नवी दिल्ली : सरकारची डिजिटायझेशनची महत्त्वाकांक्षी योजना दुसर्‍या टप्प्यात पोहोचत असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरसंचार नियामक 'ट्राय'ला केबल टीव्ही क्षेत्रातील एकाधिकारशाही थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची सूचना केली आहे.

बाजारातील एकाधिकारशाहीमुळे ग्राहकांची निवड करण्याची सुविधा संपते. त्यामुळे ही एकाधिकारशाही कशा पद्धतीने थांबवता येईल याची माहिती ट्रायकडून घेण्याची विनंती आपण मंत्रालयाला केली आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री मनीष तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले. 2014 पर्यंत विशेषत: हा मुद्दा कसा निकाली काढता येईल याची माहिती ट्रायने मंत्रालयाला देणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. पंजाबसारख्या राज्यामध्ये 'एमएसओ'मधील काही लोकांचे प्रभुत्व लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे काय? या प्रश्नासंबंधी तिवारी बोलत होते. हा प्रश्न पंजाब किंवा कोणत्याही एका राज्याशी संबंधित नाही.

हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही ग्राहकाला सक्षम बनवण्यासाठी एखादी पारदर्शी योजना तयार करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याच्याकडे संचालकांविषयीही अधिक पर्याय असले पाहिजे,असे ते म्हणाले.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS