मुंबई : संविधान स्वीकृती दिनानिमित्त अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँडव्होकेट्स असोसिएशनने दादर येथे 25 नोव्हेंबर रोजी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन केले आहे. 'घटनात्मक दृष्टी आणि राज्यकारभार : भारतात न्याय प्रणालीची भूमिका' या परिसंवादाचा मुख्य विषय असणार आहे. नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.या एकदिवसीय परिषदेत विधी व्यवसाय आणि शिक्षण, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्त्या, न्यायपालिकेत कर्मचार्यांसाठीचे आरक्षण, अँट्रोसिटी कायद्याला प्रतिबंध, महिला सबलीकरण, आंबेडकरवादी वकिलांची भूमिका आणि कार्य या विषयावर विचारमंथन केले जाणार आहे. अध्यक्षस्थान अँड. माधवराव वाघ भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून न्या. एच. सुरेश, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. अँड. डॉ. सुरेश माने, विधी महाविद्यालयातील माजी प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. डॉ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Post Top Ad
25 November 2012
Home
Unlabelled
'घटनात्मक दृष्टी..' विषयावर परिसंवाद
'घटनात्मक दृष्टी..' विषयावर परिसंवाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment