..तरच बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी बोलावे - माजी आ. बाबुराव माने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2012

..तरच बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी बोलावे - माजी आ. बाबुराव माने


मुंबई : शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत इतर पक्षातील नेते आणि नगरसेवक आपली मते व्यक्त करत आहे. हिमालयासारख्या उंची असलेल्या बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत आपण बोलत आहोत. त्यामुळे आपली उंची पाहूनच स्मारकाविषयी बोलावे, असे आवाहन माजी आ. बाबुराव माने यांनी केले आहे.

मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी इंदू मिलच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारावे, असे आवाहन केले होते. देशपांडे यांचे हे व्यक्तव्य त्यांच्या पक्षाची आणि शिवसेनेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. नगरसेवक असलेल्या देशपांडे यांनी स्थानिक विकासकामांकडे लक्ष द्यावे. कोणत्या आदरणीय व्यक्तीबाबत आपण बोलत आहोत याचे भान देशपांडे यांनी ठेवायला पाहिजे, असे माने यांनी म्हटले आहे.शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत जनतेने जनभावनेचा आधार घेऊन निर्णय घ्यावा. तशी राज्यभरातील शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्याने स्मारकाबाबात व्यक्तव्य करताना आपण बाळासाहेबांची उंची कमी करत नसल्याचे भान ठेवावे, असेही माने यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS