आझाद मैदानात शिक्षकांचे जेल भरोआझाद मैदानात शिक्षकांचे जेल भरो - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2012

आझाद मैदानात शिक्षकांचे जेल भरोआझाद मैदानात शिक्षकांचे जेल भरो


मुंबई : महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पल्रंबित मागण्या मान्य न केल्यामुळे गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत जेल भरो आंदोलन केले. या वेळी शेकडो शिक्षक आंदोलनकत्र्यांना पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांचा कायम शब्द काढून 15 नोव्हेंबर 2011 च्या नियमाप्रमाणे मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली; परंतु त्यामधील जाचक अटीमुळे महाराष्ट्रातील 5 ते 10 टक्के शाळा पात्र ठरल्या. त्यामुळे समितीने तीव्र आंदोलन केले होते. हजारो शिक्षक योग्य निर्णयाची वाट पाहत आहेत. दसरा, दिवाळी आदी सण सोडून शिक्षकांनी आझाद मैदानात किती वष्रे आंदोलने करायची, असा सवाल शिक्षक करत असतानाही सरकारला जाग येत नसल्यामुळे शिक्षकांनी गुरुवारी जेल भरो आंदोलन केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS