शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज, शनिवारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. दुपारी ३.३३ वाजता बाळासाहेबांनी 'मातोश्री' निवासस्थानी अखेरचा श्व
ास घेतल्याचं डॉक्टर जलील परकार यांनी सांगितलं आणि 'साहेबां'वर जीवापाड प्रेम करणा-या शिवसैनिकांच्या दुःखाला पारावार उरला नाही.
बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरीच खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. बुधवारी रात्री त्यांची तब्येत अधिकच नाजुक झाल्यापासून तर लाखो शिवसैनिक तहानभूक हरपून, आपल्या 'दैवता'च्या उदंड आयुष्यासाठी देवाचा धावा करत होते. दुसरीकडे, लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक 'मातोश्री'तच त्यांच्यावर उपचार करत होते. कधी ऑक्सिजनचा पुरवठा करून, तर कधी व्हेंटिलेटरच्या सहाय्यानं त्यांचे अथक प्रयत्न सुरू होते. सुदैवानं, दोन दिवस बाळासाहेबांकडून उपचारांना प्रतिसादही मिळाला आणि शिवसैनिक सुखावले. पण आज दुपारी चार वाजल्यापासून कलानगरमध्ये हालचालींना वेग आला आणि सा-यांच्याच काळजात चर्रर्र झालं. थोड्याच वेळात, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि डॉ. जलील परकार बाहेर आले आणि त्यांनी शिवसैनिकांना नकोनकोशी वाटणारी बातमी दिली. दुपारी ३.३३ वाजता बाळासाहेबांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा श्वासोच्छवास थांबला, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंयात्रा उद्या सकाळी साडेसात वाजता 'मातोश्री' निवासस्थानापासून निघणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ही अंत्ययात्रा वांद्र्याहून दादर इथल्या शिवाजी पार्कपर्यंत (शिवतीर्थ) जाईल. तिथेच बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशभरातील तमाम शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य जनतेला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेता येईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

No comments:
Post a Comment