अग्निशमन दलाचा 17 डिसेंबरला मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 December 2012

अग्निशमन दलाचा 17 डिसेंबरला मोर्चा


मुंबई : मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सुहास जोशी यांच्या ढिसाळ कारभारामुळे कर्मचार्‍यांच्या पल्रंबित मागण्या पूर्ण होत नाहीत, याचा निषेध करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेच्या वतीने 17 डिसेंबरला आझाद मैदानात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे चिटणीस राजाराम धुरी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे. 20 वर्षे सेवा होऊनही या दलातील जवानांची कालबद्ध पदोन्नती होत नाही. ऑन डय़ुटीचे फायदेही देण्यात येत नाहीत. जादा कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही, या व आदी मागण्यांबाबत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने अग्निशमन जवानांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS