| मुंबई : मुंबई महानगरपालिकेत गुणवत्ताधारक अभियंते प्राप्त व्हावे तसेच सर्व उमेदवारांना एकाच पद्धतीने सामायिक परीक्षेद्वारे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी याचा विचार करून पालिका प्रशासनाने दुय्यम आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेत वॉक-इन-सिलेक्शन ऐवजी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉक-इन सिलेक्श पद्धतीमुळे अनेक गुणी उमेदवारांवर अन्याय होतो. हे पाहता स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे या वेळी होणार्या अभियंत्यांच्या भरतीमध्ये वॉक-इन-सिलेक्शन ऐवजी ऑनलाइन परीक्षेद्वारे भरती करण्याची मागणी केली होती. वॉक-इन-सिलेक्शनमध्ये पदवी तसेच डिप्लोमाचे मार्क एकत्र करून त्याद्वारे गुणानुक्रमे उमेदवारांची निवड केली जात आहे. त्यामुळे केवळ मार्कावर आधारित निवड होत असल्याने अनेक गुणी उमेदवारांवर अन्याय होत असे. कारण महाराष्ट्रात प्रत्येक विद्यापीठाची गुणांकन पद्धत वेगळी असल्याने या अडचणी निर्माण होत असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्ता मनीषा म्हैस्कर यांनीही वॉक-इन सिलेक्शन पद्धतीत बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात प्रत्येक महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाची गुणांकन पद्धत वेगळी असल्याने मुंबईतील व्हिजेटीआय सारख्या प्रख्यात संघटनेचा विद्यार्थीही मागे पडतो, तर मुंबईबाहेरचा विद्यार्थी त्यांच्या गुणांकन पद्धतीमुळे टॉपर होतो. त्यामुळे सर्व उमेदवारांची गुणवत्ता एकाच पातळीवर तपासण्यासाठी या वेळी वॉक-इन-सिलेक्शन ऐवजी ऑनलाइन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, केंद्र शासनाच्या धर्तीवर दुय्यम आणि कनिष्ठ अभियंत्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जानेवारीत अर्ज घेतले जाणार असून फेब्रुवारीत परीक्षा घेतली जाणार आहे. |
Post Top Ad
15 December 2012
Home
Unlabelled
पालिकेत अभियंत्यांची ऑनलाइन परीक्षेद्वारे भरती
पालिकेत अभियंत्यांची ऑनलाइन परीक्षेद्वारे भरती
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment