| मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला 'माडबन जैतापूर मिठगावणे पंचक्रोशी संघर्ष समिती'चा कायम विरोध आहे. सरकारने या प्रकल्पाविषयी गांभीर्याने भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे व आदी पदाधिकार्यांनी पत्रकार संघ येथे गुरुवारी दिला. बेकायदेशीरपणे संपादित केलेल्या शेतकर्यांच्या जमिनी त्यांना पुन्हा परत करा, अणुऊर्जा जगात कुठेच नको, एनपीसीआयएलच्या दबावाखाली निरीने केलेला पर्यावरणीय अहवाल रद्द करावा या व आदी मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, पर्यावरणाचा नाश करणारा हा विनाशकारी प्रकल्प रद्द करून इतर पर्यायी मार्गाचा उपयोग करावा. भारतीय पर्यावरण चळवळ, मच्छीमार संघटना-नाटे आदी संस्थांच्या वतीने लवकरच याविरोधात तीव्र आंदोलन करून सरकारला हा मनमानी कारभार थांबवण्यासाठी भाग पाडले जाईल, असे या वेळी समितीचे सरचिटणीस प्रेमानंद तिवरकर, कार्याध्यक्ष मंगेश कासकर, खजिनदार शैलेश वाघधरे यांनी सांगितले. |
Post Top Ad
14 December 2012
Home
Unlabelled
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नकोच - प्रकाश वाघधरे
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प नकोच - प्रकाश वाघधरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment