मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभा आणि सेंटर फॉर द पब्लिक एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळ्याजवळील मळवलीत उभारलेल्या सुसज्ज अशा अस्मिता भवनात पालिका शिक्षकांसाठी सुरू होणार्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईतील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनापासून काहीसे दूर जात विरंगुळा आणि आनंदाचे चार क्षण व्यतीत करतानाच शिक्षणात येऊ घातलेले नवनवीन प्रवाह, शिक्षणातील बदल, कायदे, त्याबाबत शिक्षण मंडळाची भूमिका, शिक्षकांसमोर उभी ठाकलेली आव्हाने, अशा विविध विषयांवर पालिका सर्व भाषिक शिक्षकांना या अस्मिता भवनातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांतील आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करू न त्यांच्यात स्फूलिंग फुलविण्याचे काम या केंद्रातून पार पाडले जाईल, असा विश्वास रमेश जोशी यांनी व्यक्त केला.
Post Top Ad
14 December 2012
Home
Unlabelled
अस्मिता भवनात पालिका शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र!
अस्मिता भवनात पालिका शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment