| मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी म्हाडा प्राधिकरणाच्या इमारती असून, या ठिकाणी नेहमीच स्वच्छतेचा बोजवारा असतो. स्थानिक नगरसेविका म्हणून या रहिवाशांच्या तक्रारी आमच्याकडे येतात, मात्र आम्हाला या ठिकाणी पालिकेकडून काम करून घेण्याची अनुमती नसल्याने या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते. त्यामुळे पालिका प्रशासनाने याचा विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली. या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देताना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हाडा इमारतीमधील रहिवाशांची मते घ्यायची आणि त्या रहिवाशांसाठी पालिकेचा निधी मात्र द्यायचा नाही. मग लक्ष कोणी द्यायचे. यासंदर्भात एकतर शासनाने कार्यवाही करावी नाहीतर पालिकेला अधिकार द्यावेत. नागरिकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, तर या मुद्दय़ाला समर्थन देताना मनसे गटनेते दिलीप लांडे यांनी या इमारतींमध्ये स्थलांतरित झालेल्या चांगल्या लोकांमुळे अनेक पालिकेचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, मात्र त्यांना चांगले रस्ते नाही, स्वच्छता नाही. या इमारती पालिकेच्या विभागात असल्याने त्यांच्याकडे पालिकेने लक्ष द्यावे, असे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले की, मुंबईत हा प्रश्न पालिकेला अनेक वष्रे भेडसावत आहे. इतर प्राधिकरणांच्या जागेत त्या त्या संस्था कार्यरत असल्याने याबाबत नवीन धोरण ठरवण्यात येऊन ते स्थायी समितीत सादर केले जाईल. पालिकेच्या माध्यमातून कचरा उचलून त्या त्या संस्थांकडून पैसे वसूल केले जातील. |
Post Top Ad
15 December 2012
Home
Unlabelled
म्हाडा कॉलनीतील स्वच्छतेची जबाबदारी पालिका घेणार
म्हाडा कॉलनीतील स्वच्छतेची जबाबदारी पालिका घेणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment