मुंबई : विदेशी महागडय़ा दारूच्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीची दारू मिसळून त्याची विक्री ब्रॅण्डेड विदेशी दारूच्या नावाखाली करण्याचा गोरखधंदा नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईत वाढू लागला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याने फोर्ट येथील कारवाईत एकाला अटक करून बनावट विदेशी मद्य, रिकाम्या बाटल्या, पॅकिंग मटेरियलसह रोख रक्कम जप्त केली.
नाताळ व नववर्षाची चाहूल लागताच मुंबईत अमली पदार्थ व बनावट विदेशी मद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होते. जॉनी वॉकर, डबल ब्लॅक, ब्लॅक लेबल, रेड लेबल, ग्लेन फिडिच, अँब्सोल्युट इत्यादी महागडय़ा विदेशी मद्याच्या बाटल्या खोलून त्यामधील विदेशी मद्य काढून त्यात डीएसपी ब्लॅक, बॅगपायपर, व्हाईट फिल्ड, होडका अशी मद्ये मिसळून ते ब्रॅण्डेड विदेशी मद्याच्या नावाखाली विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. अशाच एका घटनेचा उलगडा राज्य उत्पादन शुक्ल विभागाने केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रा. सि. परमार, उपअधीक्षक गोगावले, निरीक्षक भूतकर, आर. सी. नरसाळे, बनकर, गौडा, पिळणकर व जवानांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे फोर्ट कर्नाक बंदर, हर्निमल सर्कलजवळ, 11/13 बाटावाला बिल्डिंग या ठिकाणी छापा टाकून विदेशी मद्य (स्कॉच) व भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या तसेच लष्करासाठी तयार केलेल्या मद्याच्या बाटल्या, विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या, पॅकिंग मटेरियल, एक दुचाकी, रोख रक्कम 2 लाख 37950 रुपये असा एकूण 5 लाख 13250 रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी साजिद राघवन नायर या इसमाला अटक करण्यात आली.
Post Top Ad
16 December 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment