आदिवासी महिलेची जमीन बळकावली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2012

आदिवासी महिलेची जमीन बळकावली

मुंबई : आदिवासी महिलेच्या मालकीची जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर तालुक्यातील उमरोली येथे उघडकीस आला आहे. या महिलेने आपल्याला न्याय मिळण्यासाठी 28 डिसेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. पालघर तालुक्यातील ठमाबाई सोमर्‍या रिंजड यांची उमरोली येथे 5 एकर जमीन आहे. ठमाबाईंच्या गरिबीचा तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन उमरोली येथील दीपक श्रीधर पाटील यांनी त्यांची फसवणूक करून जमीन हडप केली आहे. ही जमीन हेच त्या महिलेचे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. तीच बळकावल्यामुळे ठमाबाई यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. आपली बळकावलेली जमीन परत मिळवण्यासाठी ठमाबाई रिंजड यांनी 28 डिसेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच जमीन बळकावणार्‍या दीपक पाटील यांच्यावर जात प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांक डे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS