| मुंबई : पालिका वॉर्ड लेव्हलवरील कामे करण्यासाठी सीडब्ल्यूसी कंत्राटदार नेमून त्यांच्याद्वारे ही स्थापत्य कामे केली जातात. हे कंत्राटदार निविदा भरताना अत्यंत कमी किमतीच्या निविदा भरून कामे मिळवतात, मात्र त्या दरात नंतर कामे करण्यास या कंत्राटदारांकडून अनुकूलता दाखवली जात नाही. या कंत्राटदारांनी तीन दिवसांत कामे सुरू न केल्यास त्यांना काळय़ा यादीत टाकण्यात येईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले. निविदा मंजूर झाल्यानंतर या कंत्राटदारांकडून योग्य कागदपत्रेही वेळेवर आणून दिली जात नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात कामास उशीर होत असे. त्यामुळे या कंत्राटदारांना कागदपत्रे सादर करण्यास तीन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसे परिपत्रकही काढण्यात आले असून काही कंत्राटदारांकडून कागदपत्रे सादर झाल्यामुळे काही ठिकाणी कामेही सुरू झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. आतापर्यंत पालिकेने 300 कामांचे टेंडर काढले असून यामध्ये 125 कामांचे कंत्राट दिले गेले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिकेची पाच लाखांपर्यंतची कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा निर्णय झाला असून त्यांना अनुभवाची अट अडवणार नाही. बेरोजगार अभियंते एकूण 15 लाखांची तीन कामे करू शकतील. त्यांनी दर्जात्मक कामे केली तर त्यांना पालिकेकडून नियतितपणे अधिक कामेही दिली जातील, असे आयुक्तांनी सांगितले. |
Post Top Ad
14 December 2012
Home
Unlabelled
सीडब्ल्यूसी कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाकणार - आयुक्त
सीडब्ल्यूसी कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाकणार - आयुक्त
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment