खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्याला पोलीस कोठडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2012

खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्याला पोलीस कोठडी

माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या खंडणी बहाद्दराला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. किरण महादेव वैद्य, असे या खंडणीखोराचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. किरण वैद्य (40) हा वर्तकनगर येथील कोरस टॉवरमध्ये राहतो. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍या किरणला नौपाडा पोलिसांनी उथळसर भागात सापळा रचून अटक केली. दरम्यान, शहरातील एका व्यावसायिकाकडे त्याने सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता त्याने घेतला होता. दुसरा हप्ता घेण्यासाठी तो उथळसर भागात आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS