| मुंबई- येत्या १ जानेवारीपासून बेस्टच्या बसमध्ये पान, तंबाखू, गुटखा चघळलात किंवा पिचकारी मारलीत तर तत्काळ शंभर रुपये दंड भरावा लागणार आहे. बेस्ट बसमध्ये प्रवास करताना अनेक प्रवासी पान, गुटखा, तंबाखू चघळतात. खिडकीतून पिचकार्या मारतात. बसमध्ये थुंकून घाण करतात. याची गंभीर दखल बेस्ट प्रशासनाने घेतली आहे. बेस्ट प्रशासनाने याबाबत प्रसिद्धिपत्रक जारी केले असून १ जानेवारी २०१३ पासून बसमध्ये पान, गुटखा, तंबाखू खाण्यास आणि थुंकण्यास सक्त मनाई केली आहे, असा प्रवासी आढळला तर त्याच्या विरोधात महाराष्ट्र मोटर वाहन कायदा १९८९ कलम १०२ (२) अन्वये सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात दोषी प्रवाशाला तत्काळ शंभर रुपये दंडाचा भुर्दंड बसणार आहे. तसेच बेस्टचे वाहक आणि चालक यांनाही ऑनड्युटी पान, गुटखा, तंबाखू खाण्यास बंदी करण्यात आली आहे. बसमध्ये अथवा बेस्ट कार्यालयाच्या परिसरात थुंकल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे. |
Home
Unlabelled
बसमध्ये तंबाखू, गुटखा खाणारयांवर दंड
बसमध्ये तंबाखू, गुटखा खाणारयांवर दंड
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment