| मुंबई : सध्या वर्तमान छपाई व्यावसायिक खर्चाचे प्रमाण वाढत असून हा व्यवसाय टिकवण्यासाठी केंद्र सरकारने वरील आयात कर, अबकारी कर रद्द केले आहेत. मुंबईत असणार्या वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी न्यूज प्रिंट मुंबईत आणताना पालिकेकडे 2.25 टक्के जकात कर भरावा लागतो. या कारणामुळे अधिक महागाईने होरपळलेल्या वर्तमानपत्र मालकांना आपले छापखाने मुंबईबाहेर हलवावे लागतात. याचा विचार करून न्यूज प्रिंटवरील जकात कर पालिकेने कमी करावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत केली आहे. वर्तमानपत्र छपाईसाठी लागणारी यंत्रसामग्री दिवसेंदिवस महाग होत असल्याने वर्तमानपत्र छापणे जिकिरीचे झाले आहे. वर्तमानपत्र ही एक सामाजिक चळवळ असल्याने याकडे केवळ व्यावसायिक दृष्टीने पाहणे चुकीचे आहे. सर्वसामान्यांना परवडणार्या किमतीत ते उपलब्ध होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिका न्यूज प्रिंटवर 2.25 टक्के जकात आकारते तर नवी मुंबईत न्यूज प्रिंटवर 1 टक्का जकात असल्याने अधिकाधिक वर्तमानपत्र मालकांनी आपली छपाई प्रेस नवी मुंबईत हलवली आहे. त्यामुळे पालिकेत मिळणार्या 1 टक्का जकातीवरही पाणी सोडावे लागत आहे. याचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने न्यूज प्रिंटवरील जकातीमध्ये सूट द्यावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. |
Post Top Ad
15 December 2012
Home
Unlabelled
न्यूज प्रिंट वरील जकात कमी करण्याची मागणी
न्यूज प्रिंट वरील जकात कमी करण्याची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment